शोले ह्या सुपर डुपर हीट चित्रपटाचे लेखक जावेद अख्तर ह्यांना हृदयनाथ मंगेशकर ह्यांच्या 80
व्या जयंती निमित्त हा पुरस्कार गानसम्राद्नी लता मंगेशकर ह्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
ह्यावेळी अख्तर म्हणाले कि हा पुरस्कार त्यांच्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे कारण हा पुरस्कार
मंगेशकर परिवाराकडून देण्यात येत आहे, ज्यांचे योगदान ह्या चित्रपट सृष्टीत अनन्य साधारण
आहे. मी लिहीलेलं पहीलं गीत सिलसिला चित्रपटातलं ‘ ये कहा आ गये हम’ ह्या गीतासाठी
यश चोपडाजींना माझं नाव लता दिदिंनीच सुचवलं होतं. योगायोगाची बाब म्हणजे जावेद अख्तर
ह्यांचा पहीला पुरस्कार चित्रपट जंजीर साठी त्यांना ह्याच हॉल मध्ये देण्यात आला होता. या
प्रसंगी लता मंगेशकर म्हणाल्या कि जावेदजींनी लिहीलेली गाणी गायला मिळणे हे मी माझं
सौभाग्य समजते.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews